एस एम कृष्णा यांच्या निधनामुळे राजकारणातील सुसंस्कृत, अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

एस एम कृष्णा हे कर्नाटक व देशाच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. उच्च विद्याविभूषित असलेले एस एम कृष्णा एक अनुभवी संसदपटू होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या प्रजा समाजवादी पक्षातर्फे ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केले.

साहित्य, टेनिस व शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या एस. एम. कृष्णा यांनी राजभवन येथे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यपाल पदाची गरिमा जपली. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सुसंकृत व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे.

या दुःखद प्रसंगी एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maha Governor Radhakrishnan participates in Human Rights Day

Wed Dec 11 , 2024
Mumbai :- Governor C. P. Radhakrishnan attended the International Human Rights Day celebrations organised by the Maharashtra State Human Rights Commission at Raj Bhavan Mumbai. Former Judge of Bombay High Court N. H. Patil, Maharashtra State Human Rights Commission Chairman K. K. Tated, Members of Commission Sanjay Kumar and M. A. Saeed, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar, Padmashri Shankarbaba Papalkar, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com