– श्री दंत्त मंदीर कांद्री येथे (दि. ८) ते (दि.१५) पर्यंत महोत्सव.
कन्हान :- श्री दत्तात्रेय जयंती निमित्य भाविक मंच कांद्री-कन्हान व्दारे श्री दंत्त मंदीर कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताह सह श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात येत आहे.
रविवार (दि.८) ते शनिवार (दि.१४) डीसेंबर २०२४ पर्यंत श्री दंत मंदीर कांद्री येथे श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव सोहळा भाविक मंच कमेटी कांद्री-कन्हान व्दारे आयोजित करण्यात आलेला आहे. रवि वार (दि.८) ला दुपारी १२ वाजता घटस्थापना व ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यात दररोज सकाळी ६ ते ७ काकडा भजन, सकाळी ७.३० ते ९.३० व दुपारी ४ ते ५.३० श्रीमद भागवत पारायण, दुपारी १२.३० ते ३.३० महिला मंड ळ कांद्री व्दारे रामायण पाठ, सायं. ६ ते ७ हरिपाठ रात्री ८ ते १० भारूड, किर्तन आणि हरिभजन आदी कार्यक्रम सुरू आहेत. शनिवार (दि.१४) ला सकाळी ९ वाजता श्री दत्तात्रेय महाराजांची (पालखी) नगर भ्रमन करून मंदिरात परत येईल. रविवार (दि.१५) डीसेंबर २०२४ ला सकाळी ९ ते ११ पर्यंत श्री दत्तात्रेय मुर्तीचा अभिषेक, हवन, पुजन व दुपारी १ से ३ पर्यंत ह.भ.प. श्रीमती ज्योतीताई झोडे मु. नाकाडोंगरी यांचे गोपाल काल्याचे किर्तन आणि त्यानंतर सायं. ५ वाजे पासुन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. करिता सर्व भाविकांनी तन-मन-धन अर्पण करून उपस्थित राहुन मानव देहाच्या आत्मकल्याणा करिता आनंदमय संधी चा लाभ घ्यावा. अशी विनंती भाविक मंच कमेटी कांद्री – कन्हान व्दारे करण्यात आली आहे.