महाज्योती’च्या संशोधकाने सोयाबीनवरील रोगाचा शोधला उपाय

– डॉ. गोविंदा सांबळे यांचे तांबेरा रोगावर उपयुक्त संशोधन

– सुर्यप्रकाश अवधी कमी-अधिक असला तरी सोयाबीन

उत्पादनात होणार नाही परिणाम

– उत्पादकता वाढ होऊन शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

नागपूर :- राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. सोयाबीनला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी या अल्पावधीत काढणीला येणाऱ्या पिकाची लागवड करून चांगले उत्पन्न प्राप्त करत असतात. अशातच हवामान बदल व पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच तांबेरा रोगाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन पिके वाचविण्यासाठी होत असलेल्या धडपडीला लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (‘महाज्योती’) चे संशोधक डॉ. गोविंदा राजेंद्र साबळे यांनी प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला आहे. डॉ. गोविंदा साबळे यांनी तांबेरा रोगावरही उपयुक्त संशोधन केले आहे. तसेच सुर्यप्रकाश अवधी कमी-अधिक (फोटोपिरिओडीझम) असला तरी उत्पादनात परिणाम होणार नाही. याशिवाय उत्पादकता वाढ होऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.

‘महाज्योती’ मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे. अहिल्यानगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्राध्यापक डॉ. व्ही. पी. चिमोटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. गोविंदा साबळे यांनी आपला प्रबंध 5 वर्षात यशस्वी पूर्ण केला. पुण्यातील हवेली तालुका चिखली येथे राहणारे डॉ. गोविंदा साबळे यांच्या पीएचडीचा विषय ‘जेनेटिक एनालिसिस ऑफ फोटोपेरिओड इंसेन्सिटिविटि, लांग जुवेनाइल एंड रस्ट रेजिस्टेंस ट्रेट इन सोयाबीन’ असा होता. महाराष्ट्रातील प्रमुख पिकामधील एक पिक म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीन हे एक सूर्यप्रकाशा भोवती संवेदनशीलता दाखवणारे पिक आहे. गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे मान्सून ची आगमनाची वेळ सातत्याने बदलत आहे. अश्यातच सोयाबीनची पेरणी जर उशिरा झाली तर त्याच्या उत्पन्नात घट होते. उत्पन्न घटण्याचे कारण हे प्रामुख्याने त्याला लागणाऱ्या सूर्य प्रकाशाच्या अवधी वर आहे. विशिष्ट अवधी प्रमाणे जर पिकाला सूर्यप्रकाश भेटला नाही (11.8 तासांपेक्षा कमी ) तर पिकाच्या फुलोरा अवस्थेवर आणि परिपक्वतेवर परीणाम होऊन त्याची उत्पादन क्षमता घटते. त्यामुळे त्यांनी या संशोधनामधे अश्या काही जनुकांचा (QTL) चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे जे या सूर्य प्रकाश अवधी ला असंवेदनशीलता दाखवून योग्य प्रमाणात फुलोरा येण्यास कारणीभूत ठरतात. तर हि जनुके (E1, E2, E3, E4, E6) आपणास प्रामुख्याने EC 3909977 व AGS 25 या प्रजाती मध्ये आढळतात. या प्रजातींचे आपल्या भागात येणाऱ्या सोयाबीन पिकात (KDS-753 व JS-2098) संक्रमण करून जनुक हस्तांतर करता येते. तसेच जनुक हस्तांतर केल्यामुळे त्याची फुलोरा येण्याची क्षमता व उत्पन्न हि सूर्य प्रकाशाच्या अवधी वर अवलंबून राहणार नाही. यासाठी डॉ. गोविंदा साबळे यांनी 2 विभिन्न प्रजातीचे संक्रमण केले (JS-2098 x EC 390977 व KDS 753 x AGS 25). त्यापासून भेटणारे बिज आपण पुढचे 3 सिझन, क्षेत्रीय चाचणी करिता पेरणी केली. यानंतर त्यांच्या जनुकांचे हे लॅब मध्ये विश्लेषण केले. संक्रमण करून जे बीज उत्पादन भेटले ते डॉ. गोविंदा साबळे यांनी विद्यापिठातील संशोधन केंद्राला सादर केले आहे व पुढील चाचणी कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रस येथे सुरु आहे.

 संशोधनाला लागला 5 वर्षांचा अवधी

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने येणाऱ्या तांबेरा ह्या रोगावर डॉ. गोविंदा साबळे यांनी दुसरे संशोधन केले आहे. या रोगाला महाराष्ट्रातील राहुरी विद्यापिठाने रोग प्रतिकारक जाती (KDS-753 व KDS-726) निर्माण केल्या आहेत. परंतु कालांतराने या जातींची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली आणि उत्पन्न घटण्यास सुरुवात झाली. तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी डॉ. गोविंदा साबळे कनार्टक राज्यातील धारवाड येथुन EC-242104 या जातीचे बियाणे आणले. त्यासाठी डॉ. गोविंदा साबळे यांना ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. या जातीचे संक्रमण आपण आपल्या भागातील प्रामुख्याने येणाऱ्या KDS-753 या जातीसोबत केले व त्या पासून भेटणाऱ्या बियांची चाचणी हि कृषी संशोधन केंद्र, कसबे दिग्रज येथे केली. या चाचणी मध्ये येणाऱ्या बीज उत्पादनाची तांबेरा रोग प्रतिकारक क्षमता वाढल्याचे निदर्शनास आले.

डॉ. गोविंदा साबळे यांना संशोधनात जवळपास 5 वर्षाचा अवधि लागला. या काळात ‘महाज्योती’ने 2021 पासून त्यांना अर्थसहाय्य केले. ज्यामुळे डॉ. गोविंदा साबळे यांचे संशोधन पूर्ण झाले. वरील केलेल्या संशोधनामधुन आगामी काळात नक्कीच नव्या सोयाबीन पिकांचे वाण मिळतील. तसेच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. डॉ. गोविंदा साबळे यांना ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांचे सहकार्यासह वडिल राजेंद्र साबळे आणि आई संगिता साबळे यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’ संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार असा विश्वास डॉ. गोविंदा साबळे यांनी व्यक्त केले.

 शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा : राजेश खवले

‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज महाज्योतीच्या मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे विविध क्षेत्रात महाज्योतीचे विद्यार्थी यशस्वी संशोधन करीत आहेत. अशातच आज कृषी विज्ञावर डॉ. गोविंद साबळे यांनी सोयाबीन पिकांवर केलेले यशस्वी संशोधन हे आपल्या कृषी प्रधान असलेल्या भारताला प्रगती पथावर नेणार नक्की. डॉ. गोविंदा सांबळे यांचे तांबेरा रोगावर उपयुक्त संशोधनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार तसेच पिकांची नासाडी होणार नाही. याशिवाय सुर्यप्रकाश अवधी कमी-अधिक असला तरी सोयाबीन पिक आणि उत्पादनात परिणाम होणार नाही. असा अनोखे संशोधन डॉ. साबळे यांनी केले असून अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेणार, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचे देशात प्रथम स्थान कायम - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Tue Dec 10 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य असून देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, राज्याचे 14 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती मिळते. मागील आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी होता. तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com