नागपूर :- भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, प्रकाश खानझोडे, शैलेश जांभुळकर, नरेंद्र रामटेके इतर कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते.
तसेच संविधान चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.