नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई :- नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ४) संपन्न झाला.

यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाईप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

व्हाईस ऍडमिरल निवासस्थानी स्वागत समारंभाला उपस्थिती

या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी ‘नेव्ही हाऊस’ येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ व चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निमंत्रित नौदल अधिकारी व माजी अधिकारी तसेच गणमान्य व्यक्तींना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह यांनी राज्यपालांना निमंत्रित मान्यवरांचा परिचय करून दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची धान खरेदी केंद्रांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी संजय कोलते

Thu Dec 5 , 2024
– कारधा धान खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट भंडारा :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान खरेदी केंद्रावरती शासनाच्या नियम व अटी नुसार कामकाज होत की नाही? याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दि. 4 डिसेंबर रोजी भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा धान खरेदी केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत नरेश वंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी,सुधीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com