नागपूर :- पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत, सिरसकर भवन, दक्षिणामुर्ती चौक, नागपूर येथे राहणारे फिर्यादी समीर विनायक मुळे, वय ३२ वर्ष, यांनी त्याचे घरासमोर त्यांची हिरोहोन्डा स्प्लेंडर गाडी के. एम. एच बी ४२१४ किंमती ४०,०००/- रू. ची पार्क करून, लॉक करून, ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली, अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे कोतवाली येथे अज्ञात आरोपीविरूद कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून त्यांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचे ईतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे सोबत संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली हिरोहोन्डा एलेंडर गाडी के. एम.एच बी ४२१४ किंमती ४०,०००/- रू. ची जप्त करण्यात आली. तिन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना अधीक विचारपुस केली असता त्यांनी दि. १८११.२०२४ रोजी पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत एमआयजी क्वॉर्टर, वकीलपेठ येथुन हिरोहोंडा सीडी १०० एमएच ३१ एक्यू ७९७८ ही सुध्दा चोरी केल्याची कबुली दिली. त्याचें ताब्यातुन चोरी केलेले वाहन जप्त करण्यात आले. गुन्हेशाखा पोलीसांनी दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ८०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता कोतवाली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांने मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, व त्यांचे पथकाने केली.