यवतमाळ :- युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि.4 व 5 डिसेंबर रोजी अमोलकचंद महाविद्यालयात करण्यात आले आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवा महोत्सवात संकल्पना आधारित स्पर्धांमध्ये सांघिक, वैयक्तिक विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना, सांस्कृतिक लोकगीत, समुह लोकनृत्य, कौशल्य विकास कथा लेखनमध्ये चित्रकला, वक्तृत्व, कविता, फोटोग्राफी तसेच युथ आयकॉन स्पर्धा होणार आहे. महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या युवक युवतीचे वय 15 ते 29 वर्षे दरम्यान असावे. पुरावा म्हणून जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड, बोनाफाईड सर्टीफिकेट सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. कला प्रकारात सहभागी कलाकारांना आवश्यक ते साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेणे बंधनकारक राहील. संयोजन समितीमार्फत फक्त विद्युत, स्टेज व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाईल.
स्पर्धेदरम्यान पंच, परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील. त्याबाबतची कोणतीही लेखी अथवा तोंडी आक्षेप स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन अमोलचंद महाविद्यालय येथे दि.4 ते 5 डिसेंबर, 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे.
सहभागासाठी इच्छुक युवक युवतींचे अर्ज दि.2 डिसेंबरपर्यंत स्विकारण्यात येईल. जिल्हास्तरावरील विजयी युवक युवतींना रोख पारितोषिक दिले जातील. युथ आयकॉनमध्ये युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वर्षाआतील युवक व युवतींना यामध्ये सहभागी होता येईल. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यासनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीन विकासासाठी केलेले कार्य, साहस इत्यादी बाबतचे कार्य क्षेत्रामध्ये युवक युवती यांनी केलेल्या प्रेरणादायी माहिती अंदाजे 2 हजार शब्दांत सादर करावेत.
विकसीत भारत यंग लिडरर्स डायलॉग अंतर्गत युवांना सहभागी होणेकरिता टेक्नॅालॅाजी फॅार विकसित भारत, विकसित भारत विराट भारत, एम्पॅावरींग युथ फॅार विकसित भारत, मेकिंग इंडीया द विश्वगुरु, मेकींग इंडीया द स्टार्टअप कॅपिटर ऑफ द वर्ड, फीट इंडीया अ मिन्स टु विकसित भारत, मेकींग इंडीया द ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग पावरहाऊस, मेकींग इंडीया एनर्जी ईफिसीयंट, बिल्डींग द इन्फ्रास्ट्रक्चर फॅार द फ्युटर वुमन अँन्ड इम्प्रू सोशल इंडिकेटर असे विषय आहेत.
विकसित भारत क्वीट प्रथम टप्पामध्ये वैयक्तिकरित्या युवांना सहभागी होता येईल. यासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा दि. 5 डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे. यासाठी शाळा व कॉलेज यांनी माय भारत पोर्टलवर सहभाग नोंदवावा. द्वितीय टप्पा विकसीत भारत निबंध लेखन आहे. प्रथम टप्प्यात सहभागी होवून निवड झालेल्या युवांचा यामध्ये सहभाग राहील. उपरोक्त 10 विषयांपैकी एका विषयावर निबंधलेखन करता येईल. सदर स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने दि. 8 ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
तृतीय टप्पा विकसित भारत पीपीटी चॅलेंज असेल. उपरोक्त 10 विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातून 4 युवांची याकरिता निवड करण्यात येणार आहे. निबंध माय भारत पोर्टलवर अपलोड करावे लागेल. सदर स्पर्धा दि.20 ते 26 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. चतुर्थ टप्प्यामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना प्रथम 11 जानेवारी रोजी सादरीकरण करावे लागेल. यामधून अंतीम फेरीसाठी निवड झालेल्या युवांना प्रधानमंत्र्यांसमोर संकल्पनांचे सादरीकरण दि.12 जानेवारी रोजी करावे लागतील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.