नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टिने मनपा आयुक्तांची सीओसीला भेट

– नागरी तक्रारी संदर्भात सक्रियतेने कार्यकरण्याचे दिले निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांना दर्जेदार सोयी सुविधा प्रदान करतानाच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या वेळीच सोडविल्या जाव्यात यासाठी मनपा कार्यरत आहे. नागरी तक्रारींना प्राधान्याने सोडविण्यासह त्यांच्याद्वारे प्राप्त अभिप्रायाची योग्य ती दखल घेण्यात यावी व प्राप्त तक्रारींचे वेळीस निराकरण करावे, अशा सक्त सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

नागपूर महानगरपालिकेला प्राप्त नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टिने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता:29) मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर अर्थात सीओसी येथे भेट दिली. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, मनपाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगर पालिकेला एका वर्षात प्राप्त तक्रारींची माहिती जाणून घेतली. गत वर्षभरात मनपाला 26,111 तक्रारी विविध माध्यमांवरून प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. यात मनपाच्या वेबसाईट वरून 15,735 तक्रारी प्राप्त झाल्यात तर, मनपाच्या ‘माय नागपूर’ अँपच्या माध्यमाने 7,453 तक्रारी, उद्यान संदर्भात 209 तक्रारी व विविध समाज माध्यमांवरून 2,714 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सादर करण्यात आली. प्राप्त तक्रारी मधून 25,401 तक्रारी सोडविण्यात आल्या, तर 232 तक्रारींवर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्त डॉ.चौधरी यांना देण्यात आली.

मनपातर्फे तक्रारींचे निवारण करण्याकरिता विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. नागरी तक्रारी संदर्भात नागरिकांचे अभिप्राय घेऊन त्याद्वारे प्रणालित बदल करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिल्या. तसेच मनपाद्वारे लवकरच नागरी समस्यांचे वेळीत निराकरण करण्याच्या दृष्टिने कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून, टोल फ्री क्रमांक 155304 हा हेल्पलाईन क्रमांक कॉल सेंटर साठी असणार आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. चौधरी यांनी तातडीने कार्य पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हनुमान मंदिर से निकली श्री राम कथा की शोभायात्रा

Fri Nov 29 , 2024
– महाप्रसाद का हुआ आयोजन नागपुर :- 2 नंबर नाका के खसाला में स्थित श्री हनुमान मंदिर में श्री राम कथा व ज्ञानेश्वर माऊली संजीवन समारोह का भव्य आयोजन मंदिर समिति की ओर से किया गया। श्री राम कथा के समापन अवसर पर मंदिर परिसर से भव्य शोभायात्रा निकाली गई व संध्या में महाप्रसाद का आयोजन किया गया।जिसका लाभ अनेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!