भंडारा :- नैसर्गिक आपत्ती पीकाची नुकसान भरपाई,पीक कर्ज या सुविधंसाठी रब्बी हंगाम 2024-25 स्वत:शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवायचा आहे.पीकांचे नोंद E-peek Pahani ई-पीक पाहणी DCS डिसीएस मोबाईल ॲपद्वारे 15 जानेवारी,2025 पर्यत शेतकऱ्यांनी स्वत : नोंद करुन घ्यावे.शेतकऱ्यांनी केलेली नोंद स्वयंप्रमाणीत मानण्यात येणार आहे.पीकाची नोंद घेत असतांना चुकिची नोंद असल्यास स्वत:शेतकऱ्यांना 48 तासात दुरस्ती करता येईल. पीक कर्ज,पीकाची नुकसान भरपाई इत्यादी सुविधा लाभ आपल्या 7/12 वर पीकाची नोंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विहित कालावधीत 1 डिसेंबर,2024 ते 15 जानेवारी,2025 पर्यत विहित वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी,असे जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना आवाहन केले आहे.पीक पाहणी करताना अडचणी आल्यास 02025711712 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावे,असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्र महसुल विभागानी कळविले आहे.