निवडणूक ही फक्त विचारांची लढाई

– रामटेक विधानसभा क्षेत्रातील दोन मुख्य प्रतिद्वंदी उमेदवारांचे चिन्हाचे झेंडे एकाच विद्युत खांबावर,अरोलीतील पक्षीय कार्यकर्त्यांनी दहा दिवसाच्या निवडणूक साठी दिला मित्रत्वाचे नाते,रक्ताचे नाते न तोडण्याच्या संदेश

कोदामेंढी :- सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हा जिल्ह्यात ,तालुका तालुक्यात ,गावा गावात विधानसभेच्या निवडणुकी निमित्य बॅनर , पोस्टर, फलक, तोरण झेंड्या लावून घरोघरी पत्रके वाटून गाड्यांमध्ये पक्षीय फलक लावून माईक बसवून आपल्या पक्षाच्या उमेदवार इतर पक्षांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे , त्यामुळे मतदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरियल बटन दाबून त्यांना प्रचंड मुमताने निवडून आणावे , असे सांगत प्रचार कार्य करत आहेत. अनेक ठिकाणी निवडणूक सुरू असताना पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्ताचे नाते व मित्रत्वाचे नाते बाजूला सोडून निवडणूक जणू विचारांची लढाई नसून माणसाची लढाई असल्याचे भासवत भांडण होण्याचे व ते विकोपाला जाण्याचे प्रमाणही वृत्तपत्रात नेहमी वाचायला मिळत आहे. मात्र याला अपवाद रामटेक विधानसभा क्षेत्रातील अरोली गाव ठरत आहे. या गावात रामटेक विधानसभा क्षेत्रातील 17 उमेदवारांपैकी दोन मुख्य प्रतिद्वंदी असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल हे धनुष्यबाण चिन्हावर तर काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक हे बॅट चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. मात्र या दोघांचेही झेंडे एकाच पोलवर येथील कार्यकर्त्यांनी लावत ही माणसाची लढाई नव्हे तर ही विचारांची लढाई आहे हा संदेश तालुक्यात ,जिल्ह्यात ,राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात देत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामटेक विधानसभा क्षेत्रात मैदानात असलेल्या 17 उमेदवारांपैकी रामटेक भंडारा महामार्गाच्या रस्त्यालगत स्थित असणाऱ्या अरोली येथील रस्ता दुतर्फा व गावात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार आशिष जयस्वाल (धनुष्यबाण), शिवसेना उबाठा चे उमेदवार विशाल बरबटे (मशाल) काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक( ब्याट), इतर अपक्ष उमेदवार चंद्रपाल चौकसे( टॉर्च )सचिन किरपान( सिलाई मशीन) विजय हटवार (सिलेंडर) रोशन गडे (हिरा) असे सात उमेदवारांचे फलक त्यांच्या चिन्हासहित दिसत आहेत. प्रचार साधनांच्या व कार्यकर्त्यांच्या ताफा पाहता मुख्य लढत जयस्वाल विरुद्ध मुळक या दोघांमध्ये होणार असल्याचे अरोली व परिसरातील अनेक राजकीय जाणकारांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले .मात्र या दोन्ही मुख्य प्रतिद्वंदींचे झेंडे एकाच विद्युत खांबावर अरोली येथील त्यांच्या समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी लावून निवडणूक ही माणसांमधील लढाई नसून विचारांची लढाई असल्याचे भासवत आहेत. दहा दिवसाच्या निवडणुकीसाठी आम्ही आमच्या गावातील रक्ताचे व मित्रत्वाचे नाते तोडत नसल्याचे शिवसेना शिंदे गटाचे मौदा तालुका अध्यक्ष व अरोली सरपंचा रोशनी भुरे यांचे पती प्रशांत भुरे यांनी आज 12 नोव्हेंबर मंगळवार ला सकाळ दरम्यान निवडणुकीसंबंधी चर्चेदरम्यान सांगितले तर मुळक समर्थकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर याच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकांची शाळा मधील विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा जागर

Wed Nov 13 , 2024
– ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग : शंभर टक्के मतदानाची घेतली शपथ नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रेशीमबाग येथील लोकांची शाळा मधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मंगळवारी (ता.१२) लोकांची शाळा मधील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढून मतदानाचा जागर केला. ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत मनपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!