दिवाळीत गावी जाताय, खबरदारी घेणे गरजेचे, चोरी होणार नाही यासाठी पोलिसांना कळविणे आवश्यक

कोदामेंढी :- सध्या दिवाळीच्या शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे सर्वच कुटुंब दिवाळीनिमित्त फिरायला जातात. भाऊबीज व पंचमी निमित्त महिला आपल्या माहेरी जातात .दिवाळीच्या सुट्टीत घर बंद करून परगावी जाताना खबरदारी घेणे गरजेचे असते. कारण अशा बंद घरांवर चोरट्यांची बारीक नजर असते. सणाच्या काळात बंद घराची रेकी करून चोरी घरफोडया केल्या जातात .त्यामुळे परगावी जाताना घरातील दागिने रोकड यांची विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरे बंद असली की त्याकडे चोरट्यांचे लक्ष लगेच जाते .हल्ली रात्री होणाऱ्या घरफोडीच्या घटना दिवसा देखील घडू लागल्या आहेत. दिवाळीची सुट्टी लागताच अनेक जण गावाकडे किंवा पर्यटनस्थळांकडे धाव घेतात. अशा वेळी घराला कुलूप असल्याने चोरट्यांच्या नजरेस पडतात .संधी साधून तिथे घरफोडी होऊन घरात ठेवलेले दागिने ,रोकड चोरट्यांच्या हाती लागू शकते .त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दिवाळीसाठी गावाला जाताना किंवा सुट्टीत फिरायला जाताना शक्यतो सेफ्टी दरवाजा बसवून घ्यावा. कुलूप मजबूत असावे तसेच शेजाऱ्यांनाही कल्पना द्यावी.

दिवाळीत बाहेरगावी जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी

घराचे दरवाजाची कडि व्यवस्थित लाऊन, कुलूप साखळी द्वारे बंद करावेत. घरा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना आपण बाहेरगावी जात असल्याची पूर्वकल्पना घ्यावी. सोबतच नजीकच्या पोलीस स्टेशन येथे असलेल्या पोलिसांना याबाबत अर्ज द्वारे सुचना देऊन बाहेरगावी जात असल्याचे कळवावे . अशावेळी आपल्या घरामध्ये कोणत्याही स्वरूपाची रोख रक्कम, दागिने मौल्यवान वस्तू ठेवू नयेत ,असे आवाहन पोलिसांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून करण्यात येते. नागरिकांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे घराचे सुरक्षा स्वतः वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कुटुंबातील नातेवाईक ,मित्र मंडळींना आपल्या घराकडे लक्ष देण्यासाठी सांगावे .याशिवाय संबंधित पोलिस ठाण्यामध्ये घरी कोणी नसल्याची व बाहेरगावी जात असल्याची माहिती अर्ज द्वारे घर क्रमांक सहित लिहून द्यावे .दिवाळीच्या सणाच्या दरम्यान बाजारपेठेत प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी लोकांचे मोबाईल ,दागिने ,पाकीट चोरीला जातात .सोबत आणलेल्या सामानाची प्रत्येकानी काळजी घ्यावी व बाजारात कोणी संशयित दिसल्यास पोलिसांना याबाबत त्वरित सूचना द्याव्यात. तसेच शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवून घ्यावे, असे आव्हान पोलीस विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांचा अवमान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा - भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Wed Nov 6 , 2024
मुंबई :- महिलांबद्दल बेताल, अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपतींच्या गादीचा कायमच अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि महविकास आघाडीच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांना उद्देशून काढलेल्या उद्गारातून काँग्रेस नेत्यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com