नागपूर :- फिर्यादी नामे रशीद अनवर वल्द अमीमुल्ला अंसारी, वय ३९ वर्षे, रा. जाफर नगर, गिट्टीखदान, नागपूर व त्यांचा मित्र नामे लालसिंग सलारीया वय ५४ वर्ष रा. प्रधानमंत्री आवास योजना, सक्करदरा, नागपूर हे दोघेही सुमीत शेख सिक्यूरीटी येथे मागे ०२ वर्षा पासुन काम करतात. दिनांक ३१.१०.२०२४ चे १३.४० वा. चे पुर्वी, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे लालसिंग यांची हिरो सलेंडर गाडी क. एम.एच ०३ ई.डी ९२५५ ने पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतुन मोहम्मद रफी चौक ते भिम चौक दरम्यान रोडवरील दि विदर्भ प्रिमीयम को-ऑपरेटीव्ह सोसायटी समोरून जात असतांना, कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन लालसिंग यांचे गाडीला बडक देवुन पळुन गेला. अपघातामध्ये फिर्यादी व त्यांचे मित्र हे वाहनासह खाली पडल्यानेलालसिंग यांचे डोक्याला मार लागुन ते गंभीर जखमी झाले. पोलीसांनी त्यांना उपचाराकरीता अभिनव हॉस्पीटल व तेथुन मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी लालसिंग सलारिया यांना तापासुन मृत घोषीत केले. फिर्यादीचा उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि, उत्तम राठोड यांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरूध्द कलम १०६(२), २८१ भा.न्या.सं., सहकलम १८४ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.