नागपूर :- देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, नियोजन उपायुक्त धनंजय सुटे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
प्रदीप कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.