यवतमाळ :- जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी आपल्या शेताच्या कुंपनाला विद्युत प्रवास सोडून पिकांचे संरक्षण करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अपघात घडून जीवीत हाणी होत आहे. त्यामुळे असे प्रवाह सोडू नये, सोडल्यासस कारवाई करण्यात येईल, असे विद्युत निरिक्षक कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
यवतमाळ हा भौगोलीकदृष्ट्या मोठा जिल्हा असून जिल्ह्यातील बरेच क्षेत्र पिकाच्या लागवडी खाली आहे. त्यामुळे शेतमालक त्यांच्या शेतातील पिकाच्या सभोवती कुंपणाला विजप्रवाह सोडून पिकाचे संरक्षण करत आहेत. शेतात पिकाला तारेचे कुंपण करून विज प्रवाह सोडल्याने शेतकऱ्यांचा स्वतःचा तसेच इतर शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचे निदर्शनास आले. शेतातील पिकाला तारेचे कुंपण करून त्याला विज प्रवाह सोडल्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आक्टोंबर 2024 पर्यंत 10 मानवी विद्युत प्राणांतिक अपघात घडून त्यांना प्राण गमवावा लागला.
शेताच्या कुंपणामध्ये अनधिकृत विज प्रवाह सोडणे हा विज कायदा-2003 व भारतीय न्याय संहिता-2023 नुसार गुन्हा आहे व त्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशे विद्युत प्रवाह सोडू नये. अपघातामध्ये आरोपी शेतकऱ्यांवर केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम 2023 नुसार उचित कार्यवाही केली जाते. शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे तारेच्या कुंपणाला करंट सोडून गुन्ह्याचे भागीदार होणे टाळावे. तसेच आपले इतरांचे होणारे अपघात टाळावे, असे आवाहन विद्युत निरीक्षक यांनी केले आहे.