संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या कामठी मौदा विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार 22 ते 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या मुदतीत 29 उमेदवारांनी 33 अर्ज सादर केले होते. तर आज 30 नोव्हेंबर ला झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत 2 उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले ज्यामध्ये एक एमआयएम व एक अपक्ष उमेदवाराच्या अर्जाचा समावेश आहे मात्र पूर्ववत 29 उमेदवारांची संख्या कायम आहे.तर या 29 उमेदवारामध्ये 14 मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार तर इतर 15 अपक्ष उमेदवार आहेत.
त्यानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या 14 उमेदवारात भारतीय जनता पार्टी चे चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे,इंडियन नॅशनल कांग्रेस चे सुरेश यादवराव भोयर,महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे गणेश आनंद मुदलियार,बहुजन समाज पार्टी चे इंजिनियर विक्रांत सुरेंद्र मेश्राम ,वंचीत बहुजन आघाडीचे प्रफुल आनंदराव मानके,राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी चे राजेश बापूराव काकडे,राष्ट्रीय समाज पक्षाचे नफिस अब्दुल अलीम शेख,भीम सेना चे नितीन रामाजी सहारे,आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे प्रशांत मिलिंद बन्सोड,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)अमोल वानखेडे,पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)जगदीश इच्छापूरी वाडीभस्मे,जय विदर्भ पार्टी चे प्रशांत अनिल नखाते,आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया चे विजय जगन डोंगरे ,तर बळीराजा पार्टी चे संविधान गनाजी लोखंडे चा समावेश आहे तसेच अपक्ष 15 उमेदवारात किशोर मारोतराव गेडाम,मनोज बाबुराब रंगारी, गणेश बाबुराव पाटील,दीपक सुधाकर मुळे,नरेंद्रदत्त जयराम गौर,नाविद अख्तर मो रफिक नाविद,फिरोज अहमद अन्सारी,फैय्याज अहमद अन्सारी,बंटी श्रावण झडावने,रघुनाथ शालीकराम सहारे,राजू रघुनाथ वैद्य,शौकत अली बागवाण,सचिन भानुदास पाटील, सलीम अलाउद्दीन अन्सारी,सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी चा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर आहे. तेव्हा उमेदवारी अर्ज सादर केलेल्यापैकी किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.