कळमेश्वर :- दिनांक २८/१०/२०२४ रोजी पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेटोलींग करीत असता गुप्त बातमीदाराद्वारे माहीती मिळाली कि यातील आरोपी नामे नौशाद रशीद शेख वय ३५ वर्ष रा वार्ड क ०१ उपरवाही ता कळमेश्वर हा अवैध गांजाची विकी करित आहे. अशा माहिती वरून रेड कारवाई करून आरोपीचे घराची झडती घेण्याचे म्हटलेवरून त्यानी झडती घेण्यास नकार दिल्याने अधिक संशय झाल्याने आरोपीचे घराचे झडती घेतली असता फ्रिजमध्ये हिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या प्लॅस्टीक पन्यामध्ये काहीतरी भरून असल्याचे दिसल्याने त्याची पाहणी केली असता एकुण १६ नग एकुण वजन १६३ ग्रॅम किंमती ३२६०/-रू चा माल लहान मोठे प्लॅस्टीकचे पॅकेट खोलुन पाहीले असता मुंगीजनक गांजा आढळुन आला, तसेच आरोपीताचे अंगझडती घेतली असता ०१ ओप्पो कंपनीचा अॅन्डरॉईड मोबाईल किंमती १०,००० रू व २०० रू नगदी असा एकुण १३,४६०/- रू चा माल मिळुन आला. सदर आरोपीविरूद्ध पोस्टे कळमेश्वर येथे कलम २० (ब) (ii) एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही ही सदरची कार्यवाही ही हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल महस्के यांचे मार्गदर्शनात पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोनि मनोज काळबांडे, सपोनि वडडे, पोउपनि मनोज टिपले, सफी सुनिल मिश्रा, पाहवा दिनेश गाडगे, पोअं विवेक गाडगे यांनी पार पाडली.