संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या कामठी विधान सभेच्या निवडणुकी करिता मतदान अधिकारी -कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिये विषयी प्रशिक्षण देण्यात आले. कामठी विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता यावी याकरिता शासनाचे वतीने २५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडणूक मतदान प्रक्रियेविषयी १९ व २० ऑक्टोंबर रोजी कामठी- नागपूर मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलच्या सभागृहात निवडणुकीचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय अधिकारी सचिन गोसावी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे, मौदयाचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक मतदान प्रक्रिये संदर्भात प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण शिबिरात निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बायलट युनिट, व्हीव्हि पॅड, त्याची मांडणी करणे, सोबतच मॅकपोल (पद्धत मतदान) निवडणूक आयोगाचे परिपत्रकानुसार ठरवून दिलेल्या प्रत्येक नियमांचे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्याविषयी विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले, मतदान याद्या ,विविध प्रकारचे साहित्य ,नमुने फॉर्म भरणे ,मतदारांचे फोटो आयडी प्रूफ ओळखपत्र, बोगस मतदान व मतदानाच्या दिवशी करण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीची माहिती प्रशिक्षण शिबिरात देण्यात आली आहे मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन, बॉयलट युनिट, व्हीव्ही पॉट शील करणे व सर्व साहित्य अधिकाऱ्यांकडे विविध दाखल्या सहित जमा करण्याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे कोणताही अधिकारी, कर्मचारयानी उल्लंघन न करता निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.