आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ची जमीन वाचवण्यासाठी बसपा चा पुढाकार 

नागपूर :-नारा परिसरातील 130 एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क या नावाने महाराष्ट्र शासनाने विकास आराखड्यात आरक्षित ठेवलेली आहे. परंतु अलीकडे भूमाफिया व बिल्डर यांनी ही जागा गिळंकृत करण्यासाठी षडयंत्र रचले. त्या षडयंत्राच्या विरोधात बसपाने पुढाकार घेतलेला आहे. ही जमीन वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटर नॅशनल पार्क बचाव कृती समिती ची स्थापना करण्यात आली. नारा घाट शेजारच्या त्या जागेवर पेंडाल टाकून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या आंदोलनात बसपा सहभागी आहे.

या आंदोलन स्थळाला बसपा नेत्यांनी भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, जिल्हा सचिव अभिलेश वाहने, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी जिल्हा प्रभारी विलास सोमकुवर, उत्तर नागपूरचे अध्यक्ष अजय उके, उपाध्यक्ष अनिल मेश्राम यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

मौजा नारा येथील खसरा नंबर 161 ते 167, 169, 175, 202, 203, 211 ते 213 ही नारा रोड च्या उत्तरेकडील 130 एकर जागा चिल्ड्रन पार्क, आयटी पार्क, करमणूक केंद्र, ऑडिटोरियम, मेडिटेशन सेंटर, एज्युकेशन या सोबतच बाबासाहेबांचा भव्य पुतळा व स्मारक आदी जनउपयोगी कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने आरक्षित ठेवलेली आहे. त्याचा उल्लेख शासनाच्या विकास आराखड्यात सुद्धा आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर मंडल में सतर्कता जागरूकता सत्र आयोजित।

Sun Oct 20 , 2024
नागपूर :- नागपुर मंडल ने 16 अगस्त, 2024 से 15 नवंबर, 2024 तक चलने वाले निवारक सतर्कता पर ध्यान केंद्रित करते हुए एक व्यापक तीन महीने का अभियान शुरू किया है। इस पहल के एक महत्वपूर्ण हिस्से के रूप में, 18 अक्टूबर, 2024 को मध्य रेल, नागपुर डीआरएम कार्यालय के समाधान बैठक कक्ष में एक ज्ञानवर्धक संगोष्ठी आयोजित की गई। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com