सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त; यापैकी ४१४ निकाली

– १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vigilance Awareness session held in Nagpur Division

Sat Oct 19 , 2024
Nagpur :- Nagpur Division has embarked on a comprehensive three-month campaign focusing on Preventive Vigilance, running from August 16, 2024, to November 15, 2024. As a pivotal part of this initiative, an enlightening seminar was held on October 18, 2024, at the Samadhan Meeting Room in the DRM’s Office, Central Railway, Nagpur. The theme of this year’s Vigilance Awareness program […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com