परिसरात दुर्गंधी ,रस्त्यावर घाण, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन वर्षापासून मिळालेला निधी एकही रुपया खर्च न होता वाढवितो ग्रामपंचायत ची शान 

कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक तीन अंतर्गत येत असलेल्या महात्मा फुले चौक ते नदीकिनारा या अंदाजे 200 मीटर गावठाणच्या नकाशात असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मागील अनेक वर्षापासून येथील व परिसरातील काही असभ्य नागरिक शौचालय असूनही शासनाकडून उघड्यावर शौच मुक्त गाव घोषित होऊनही उघड्यावर शौचालयास बसत असल्याने , त्यामुळे रस्त्यावर विष्टा राहत असल्याने, रस्त्यावर घाण तर परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र येथील ग्रामपंचायतला दोन वर्षापासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळालेला 4,73,117 रुपयाचा निधी एकही रुपया खर्च न होता ग्रामपंचायतची शान वाढवीत आहे.

याबाबत वार्ड क्रमांक तीन च्या ग्रामपंचायत सदस्य अंजली मोहूर्ले यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोहूर्ले यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की या रस्त्याचे सिमेंटरीकरण न झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील काही असभ्य नागरिक घरी शौचालय असूनही रस्त्याच्या दुतर्फा शौचालयास न बसता अगदी मधोमध बसतात ,त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाणच घाण व दुर्गंधी पसरलेली असते .त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नाकात रुमाल बांधून या रस्त्याने आवागमन करावे लागते .या रस्त्याने शेतमजूर ,शेतकरी तर कपडे धुण्यासाठी नदीच्या काठावर महिला मोठ्या प्रमाणात दररोज आवागमन करत असतात. अनेक वर्षापासून ग्रामसभेत या परिसरातील नागरिक व गावातील सामाजिक कार्यकर्ते ग्रामसभेत या रस्त्याच्या सीमेंटीकरण्याकरता मागणी करतात. प्रोसेसिंगवर नोंदही करण्यात येते .परंतु अजूनही या रस्त्याचे सिमेंटीकरण न झाल्याने नकाशात दिसणारा मोठा रस्ता हा झाडाझुडपामुळे गल्ली सारखा झालेला आहे.

नुकतेच कोदामेंढी पंचायत समितीचे सर्कलचे पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम यांनी महात्मा फुले चौक स्थित दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या पुतळा असलेल्या ठिकाणच्या परिसराला सौंदर्यकरण व इतर कामाकरता तीन लक्ष रुपयांच्या निधी दिला. मात्र गेली अनेक वीस वर्षापूर्वीपासूनही महात्मा फुले चौकातून सुरू होणाऱ्या या रस्त्याकडे त्यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येतात. दुर्गंधी व घाण हा आरोग्याशी संबंधित विषय असून याकडे लोकप्रतिनिधी आधी लक्ष देणे गरजेचे असूनही लोकप्रतिनिधीही मलाईदार कामांची निवड करण्यात व्यस्त असल्याची दिसून येत आहे.

येथील घोटाळेबाज मुक्कामी न राहणारे सरपंच आशिष बावनकुळे यांचे स्वतःच्या खाजगी कामाकडे, व्यवसायाकडे जास्त लक्ष असल्याने व गावाकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामपंचायत मध्ये निधी असूनही कामे होत नसल्याने व जो निधी काढण्यात येत आहे त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे करण्यात येत आहे. तरी अजूनही ते पदावर कायम आहेत .या सरपंचाची संबंधित विभागाने त्वरित चौकशी करून व गुन्हे दाखल करून तात्काळ हकालपट्टी करावी व नवीन सरपंच निवडीच्या मार्ग मोकळा करण्याची मागणी दुर्गंधी ने त्रस्त असणाऱ्या या रस्त्यावरून आवागमन करणाऱ्या गावकऱ्यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव दीक्षाभूमी मेट्रो स्थानक करण्यासाठी मागणी

Mon Oct 14 , 2024
नागपूर :- आपली पावन दीक्षाभूमी हे जागतिक स्तरावर समतेचे, बंधुत्वाचे, आणि परिवर्तनाचे महान प्रतीक आहे. विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आता रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव दीक्षाभूमी मेट्रो स्थानक असे बदलले पाहिजे. हा केवळ नावाचा बदल नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि अभिमानाचा सन्मान असेल आणि सर्व अनुयायांना देखील दिक्षाभूमीला येताना अत्यंत सोईचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com