नागपुरात मुसळधार पावसामुळे निर्माण स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना.

जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त प्रत्यक्ष घटणास्थळांवर.

मनपाकडून विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

नागपूर, दि. २३ : शुक्रवारी रात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचल्याने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटास्थळांना भेटी देवून मदत कार्य आरंभिले आहे. एनडीआरएफची आणि एसडीआरएफच्या चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. मनपातर्फे तत्काळ मदतीसाठी हेल्प लाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

नागपुरात काल शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला.
अवघ्या ४ तासात १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ या परिस्थितीची माहिती फडणवीस यांना दिली. त्यानुसार  फडणवीस यांनी तातडीने नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्य करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करण्याच्या सूचना  फडणवीस यांनी दिल्या आहेत.

तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी शहरात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (एनडीआरएफ) एक आणि राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) दोन चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

दरम्यान, मनपाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका आपात्कालीन मदत क्रमांक.

Next Post

प्रत्येक घरी मेरी माटी मेरा देश अभियान

Sat Sep 23 , 2023
– पालकमंत्री,माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री,आमदार, जिल्हाधिकारी यांचा सक्रिय सहभाग चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अत्यंत यशस्वी ठरले असुन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार ,जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सक्रिय सहभाग दर्शवित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com