संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पाश्वरभूमीवर कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशातील कोना कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येच्या वर अनुयायी येणार आहेत.तेव्हा ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे तसेच वाहतूक व्यवस्थाच्या उद्देशाने आज दुपारी 1 दरम्यान ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे सह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रमानगर उडान पूल मार्ग ,ड्रॅगन पॅलेस भुयार मार्ग ,आजनी कामठी मार्ग परिसराची संयुक्तिक पाहणी करून वाहतूक व्यवस्थेसह नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्गासंबंधी पाहणी करीत मार्गक्रमित रस्त्याची डागडुजी सह वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याहेतु मार्गक्रमित अडचणी लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना ऍड सुलेखा कुंभारे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार उपेश अंबादे, पी.डब्लु.डी. चे सहायक अभियंता गायधने, जनबंधु, कामठी नगर परिषद नगर रचना विभागाचे अधिकारी विक्रम चव्हाण, प्रदीप भोकरे आदी उपस्थित होते.