IDBI बँकेच्या CSR फडातून सहयात्री फाऊडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने जी.एम. बनातवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 50 डेस्क बेंचचे लोकार्पण सोहळा

नागपूर :- आयडीबीआय बँकेच्या हीरक महोत्सवी समारंभाचा एक भाग म्हणून, नागपूर महानगर पालिकेच्या जी.एम. बनातवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 50 डेस्क बेंचचे उद्घाटन आणि हस्तांतरण हा उपक्रम आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री फाउंडेशन एनजीओ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, शासकिय शाळांमध्ये वंचित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि झोनल ऑफिसर, श्रीकांत तिरपुडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मनपा शिक्षण विभागाचे संयोजक भारत गोसावी होते, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अखिलेश मिश्रा, आयडीबीआय बँकेचे उप विभागीय प्रमुख, अनुराग सिंग, प्रादेशिक अधिकारी, वाय. प्रताप कुमार, उपमहाव्यवस्थापक, IDBI बँक, गिरीश गुबरे, सहायक महाव्यवस्थापक, IDBI बँके, आणि जी एम बनातवाला उच्च प्रायमरी शाळेच्या प्राचार्या ममता प्रजापती, हायस्कूल चे प्राचार्य संकुलवार उपस्थित होते.

तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संचालक विजय क्षीरसागर, विकास पाटील, धीरज उमाटे, सृष्टी पुनपसागर, सावित्री ठेंगे, संदीप वासनिक, हेमंत पांढराम, सतीश माटे या समारंभाला उपस्थित होते, श्रीकांत तीरपुडे यांनी IDBI बँकेच्या CSR उपक्रमांतर्गत शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी च्या उपक्रमाबाबत माहिती दिली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

IDBI बँकेचे CSR उपक्रम, विशेषत: शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित असलेले, वंचित विद्यार्थ्यांना उत्तम संसाधने आणि सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर सकारात्मक प्रभाव पाडणे हे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा भारत गोसावी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्तावीक विजय क्षीरसागर यानी केले व आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य ममता प्रजापती यानी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छतादूतांच्या सुमधुर संगीत प्रस्तुतीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

Wed Oct 2 , 2024
– मनपाच्या “मन की सफाई” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- स्वच्छ, सुंदर, स्वस्थ शहरासह हरित नागपूर साकारण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या स्वच्छता दूतांनी एखाद्या रॉकस्टार प्रमाणे सुमधुर संगीताची मेजवानी सादर केली.एकापेक्षा एक सरस व सुमधुर गाण्यांची प्रस्तुती करीत स्वच्छता देताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मनपाद्वारे आयोजित “मन की सफाई: स्वच्छता संग मन का उत्सव2024″ कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वभाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com