नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

– अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णालयातील सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते वितरण

Tue Oct 1 , 2024
मुंबई :- केंद्र व राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. शासनाबरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करते. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com