बेला :- गावात ठिकठिकाणी उत्साही युवकांनी मस्कऱ्या गणेशोत्सवाची स्थापना केली असून उत्सव उत्साहात सुरू आहे. वार्ड क्र. 6 मध्ये न्यू बाल गणेश मित्र मंडळ मनोरंजनाचे विविध उपक्रम राबवत असून त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कृष्णा दिग्रसकर, संजय कावळे, गणेश, रितेश कडू, शंकर लांडे,पिल्लू गौरकर, आर्यन गवळी, अनुराग भोकरे, सक्षम व दादू राऊळकर, चेतन सुरणकर व अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.