राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व डॉ. गिरीश आत्राम यांची उपस्थिती लाभली होती. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ.  गिरीश आत्राम  यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व उद्दिष्टे आपल्या भाषणातून विदित केली तसेच डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजकार्यात समर्पित भावनेने काम करावे असे आवाहन केले. डॉ. रुबीना अन्सारी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन सानिया खोके या विद्यार्थिनीने केले तर आभार अर्पित कडू या विद्यार्थ्याने मानले. दीपमाला शर्मा, प्रांजली वाटकर, स्वाती ठाकरे या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारत बीसी,  अंकित धुर्वे, क्षितिज रामटेके, दीक्षा ढोके, जयश्री घोडे, दयावंती शेंडे, प्रतीक्षा हिवरकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्वला सुखदेवे, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, डॉ. सविता चिवंडे,  डॉ. निशांत माटे, डॉ. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, डॉ. राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके,  डॉ. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख, तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमेरिका में आयोजित अंतर्राष्ट्रीय खान बचाव प्रतियोगिता-2024 में वेस्टर्न कोलफ़ील्ड्स लिमिटेड की टीम ने प्राप्त किया द्वितीय स्थान

Wed Sep 25 , 2024
कोलंबिया :- अमेरिका, कोलंबिया में 12 से 20 सितंबर, 2024 तक आयोजित अंतर्राष्ट्रीय खान बचाव प्रतियोगिता-2024 (IMRC – 2024) में वेकोलि की टीम ने समग्र रूप से द्वितीय स्थान हासिल किया। साथ ही, प्राथमिक उपचार की श्रेणी में द्वितीय स्थान प्राप्त किया। इस अंतर्राष्ट्रीय खान बचाव प्रतियोगिता में वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि) की रेस्क्यू टीम ने कोल इंडिया लिमिटेड का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com