विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत झरी जामणी आकांक्षित तालुक्यात अनोखा उपक्रम

यवतमाळ :- निती आयोगाच्यावतीने आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात झरी जामणी तालुक्याचा समावेश आहे. कार्यक्रमांतर्गत ‘विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत’ हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत विविध विभागांचे गावस्तरावरील शासकीय कर्मचारी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाचे गाव स्तरावरील कार्य, जबाबदाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेले विविध उपक्रम आणि योजना याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये विविध विभागाचे कर्मचारी एकत्र येऊन समन्वयाने जवाबदारी पार पाडत आहेत.

असा अनोखा उपक्रम राबविणारा झरी जामणी हा देशातील पहिलाच तालुका आहे. या उपक्रमांतर्गत शासनाचे विविध 11 पेक्षा जास्त विभाग एकत्र येऊन प्रभावीरित्या विद्यार्थ्यांद्वारे नागरिकांमध्ये शासकीय योजना, उपक्रम आणि निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील विभाग निहाय दर्शकांची जनजागृती केली जात आहे.

हा उपक्रम सर्व गावांमध्ये राबविण्यात येत असून त्यामध्ये गाव पातळीवरील कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी, पशुधन पर्यवेक्षक, पशु सखी, कृषी सहायक, कृषी सखी, महिला बचत गटांचे सदस्य, पोलिस, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा, एएनएम, जलसुरक्षक, स्वच्छता दुत, रोजगार सेवक, आरोग्य सेवक, शिक्षक, वनसंरक्षक, संगणक परिचालक, वीज पुरवठा कर्मचारी हे सहभागी होऊन विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत त्यांच्या विभागांचे गाव स्तरावरील कार्य, जबाबदारी आणि चालू योजना, उपक्रम याबद्दल माहितीपर मार्गदर्शन करत आहेत.

हा उपक्रम झरी अधिकारी रविंद्र कुमार सांगळे यांच्या कल्पनेतून साकारता असून यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि केळापुरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे केळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होत आहे. झरीचे तहसीलदार अक्षय रासने, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन गेडाम, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे, पशुसंवर्धन अधिकारी झेड.जे.जाधव, उमेदचे तालुका मिशन मॅनेजर प्रदीप राठोड आणि आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे हे या उपक्रमाच्या उत्कृष्टपणे अंमलबजावणी प्रयत्न करत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच निवडणूक लढवू - भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे विधान

Wed Sep 25 , 2024
नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी पूर्णविराम दिला. धनुष्यबाण आणि घड्याळ सोबत घेऊनच महायुती निवडणुकीला समोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आजोजित भाजप कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com