एकसष्टी निमित्त सुधीर दिवे यांचा जाहीर सत्कार

– सुधीर दिवे कुशल व उत्तम संघटक – देवेंद्र फडणवीस

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही कार्याचा गौरव 

नागपूर :- कामाचा प्रचंड आवाका, विषयाची जाण, धडाडी वृत्ती आणि प्रशासनाचा अनुभव असलेले सुधीर दिवे हे उत्तम व कुशल संघटक आहेत असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सुधीर दिवे यांचा सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव मला राजकीय जीवनात काम करत असताना कामाला आला आणि त्यातूनच मोठमोठ्या निर्णय प्रक्रियेत मला मदत झाली अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. येथील सॉलिटेअर सभागृहात एकसष्ठी समारंभ निमित्त आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात हे दोन्ही नेते बोलत होते. यावेळी मंचावर श्री संत सयाजी महाराज, माजी खासदार रामदास तडस, आमदार प्रतापराव अडसड, आमदार विकास कुंभारे, आमदार दादाराव केचे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार आशिष देशमुख, अनिल सोले, सुधीर पारवे, विजय जाधव माजी खासदार सुरेश वाघमारे, विश्वास पाठक यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिवे परिवाराची संघ आणि भारतीय जनता पार्टी बद्दलची निष्ठा मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मिळालेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून ती यशस्वी करून दाखवण्यात सुधीर दिवे यांची हतोटी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजकीय प्रवासामध्ये सुधीर दिवे यांचा प्रशासकीय सहभाग अत्यंत मोलाचा आहे असेही ना. फडणवीस यावेळी म्हणाले. सामाजिक क्षेत्रात संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेले विविध उपक्रम निश्चितच समाजाला उपकारक आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अतिशय भावनिक विषयांना हात घालत सुधीर दिवे यांनी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मोलाची साथ दिल्याचे उपस्थितांसमोर सांगितले. विशेषतः साखर कारखाने, ऊस उत्पादन, दूध उत्पादन, एम एस एम ई अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम या सर्वांच्या अंमलबजावणीमध्ये सुधीर दिवे यांचा वाटा मोलाचा असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. आजच्या युगात परिवार एक संघ ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणे अवघड असताना सुधीर दिवे यांनी कौटुंबिक सलोखा राखत संत अच्युत महाराज सेवा संस्थेच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य देखील केले याचे मला अत्यंत कौतुक वाटते. यापुढेही त्यांच्या कार्याला असेच बळ मिळत राहील अशा सदिच्छा ना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना सुधीर दिवे यांनी दिवे कुटुंबीयांची राजकारणाची सुरवात गंगाधरराव फडणवीस, सुमती सुकळीकर व प्रा. यॊगानंद काळे यांचे मार्गदर्शनाखाली झाली आणि इतकेच नव्हे तर मला शासकीय नौकरी लागल्यावर ती केलीच पाहिजे असा आदेश गंगाधरराव फडणवीस यांनी दिला व ती घटना माझ्या आयुष्याला दिशा देणारी ठरली असे भावनीक कबुली दिली तर नितीन गडकरी हे माझ्यासाठी पितृतुल्य असून त्यांच्या योगदानाशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय मी आजपर्यंत कोणताही उपक्रम यशस्वी करू शकलो नसतो अशी भावनिक उद्गार काढले. दिवे परिवारासाठी नितीन गडकरी आधारस्तंभ आहेत असेही ते म्हणाले. यापुढे सामाजिक जीवनात ज्या ज्या जबाबदाऱ्या देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्याकडून मिळतील त्या समर्थपणे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील व सदैव तत्पर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समारंभाचे प्रास्ताविक नगरसेवक दिलीप दिवे यांनी केले तर कौस्तुभ दिवे यांनी सर्वांचे आभार मानले. मंच संचालन नितीन कुलकर्णी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor presides over the Convocation of the Dr Homi Bhabha State University

Tue Sep 24 , 2024
Mumbai :- The Governor of Maharashtra and Chancellor of universities C.P. Radhakrishnan presided over the Annual Convocation of the Dr Homi Bhabha State University at the Sir Cowasjee Jehangir Convocation Hall in Mumbai. Degrees were awarded to more than 1500 students passing the UnderGraduate and Postgraduate examinations. Ph D degree was awarded to 11 candidates. Medals and Certificates were presented […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com