व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी म्हस्के तर सरचिटणीस पदी महाले

 – कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड, व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात

मुंबई :- जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेमध्ये बुलढाण्याचे अनिल मस्के यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली. तर जळगावचे दिगंबर महाले यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लागली. कार्याध्यक्षपदी नंदुरबारचे योगेंद्र दोरकर, परभणीचे विजय चोरडिया आणि चंद्रपूरचे मंगेश खाटीक, उपाध्यक्ष म्हणून सोलापूरचे अजित कुंकुलोळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून त्यांची निवड झाली.

गेल्या एक महिन्यापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीमुळे राज्याची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ऍड.संजीवकुमार कलकुरी आणि सीए सुरेश शेळके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. राज्यभरातल्या प्रमुख तीनशे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार म्हणून आपली भूमिका बजावली. या निवडणुकीत एकूण ९२ टक्के मतदान झालं. गेल्या तीन वर्षापासून उत्कृष्ट काम करणाऱ्या अनिल म्हस्के यांना प्रथम क्रमांकाचे मतदान देऊन त्यांची पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली. प्रथम क्रमांकाचे मतदान, द्वितीय क्रमांकाचे मतदान असे एकूण १३ क्रमांक १३ उमेदवारासाठी दिले होते. पहिल्या पसंतीच्या मतदानाला प्रदेशाध्यक्ष आणि मग इतर पसंती त्या त्या पदाप्रमाणे दिली होती. निवडणुकीच्या माध्यमातून जे पदाधिकारी विजय झालेले आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या पदांचा पदभार आला आहे.

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष, मुख्य संयोजक, तथा प्रशासकीय प्रमुख योगेंद्र दोरकर, कार्याध्यक्ष संघटन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण विजय चोरडिया, कार्याध्यक्ष संघटन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय पडोळे, कोकण आणि मुंबई विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद टोके, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर,मराठवाडा अध्यक्ष सतीश रेंगे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते, राज्य कार्यवाहक म्हणून अमर चोंदे यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली आहे. उर्वरीत आठ जणांची राज्य कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष लवकरच घोषीत करणार आहेत. येत्या २९ सप्टेंबरला मुंबईच्या प्रेस क्लब येथे सकाळी अकरा वाजता मान्यवर व्यक्तीच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले यांनी दिली आहे.

मी गेली तीन वर्ष पत्रकारांसाठी मेहनतीने काम करत होतो ती मेहनत यानिमित्ताने कामाला आली. मला पुन्हा संपूर्ण पत्रकारांनी राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेले अनिल म्हस्के यांनी दिली. आज पासून संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात येत आहे. येत्या एक ऑक्टोबर पासून नवीन जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया सुरू होईल. अशी माहिती यावेळी अनिल म्हस्के यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जहां सत्य वहां शिव का वास - योगेश कृष्ण महाराज

Tue Sep 24 , 2024
नागपुर :-जहां भी सत्य है, वहीं शिव का वास है। शिव के साथ सारी विषमता है। वे औघड़ हैं, आशुतोष हैं, देवों में महादेव हैं, रुद्र हैं, गृहस्थ हैं, महायोगी हैं, त्यागी और तपस्वी हैं, पिता है, गुरु हैं, मृत्यु हैं, जीवन हैं। उक्त आशय के उद्गार विद्या नगरी, रेशिमबाग के महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह में आयोजित शिव महापुराण में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com