आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे राबविण्याबाबत प्रशिक्षण

यवतमाळ :- जिल्ह्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा शंभर टक्के निपटारा व्हावा यासाठी राज्य शानाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण सत्राचे विशेष संबोधक मुख्य सचिव ऑनलाईन व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. प्रशिक्षण सत्रात ई-गर्व्हनन्स तज्ञ देवांग दवे व तांत्रिक सहाय्यक विनोद वर्मा यांनी सहभागी कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले. सदर विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य

Tue Sep 24 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत दिव्यांग बांधवांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता तसेच दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे वैयक्तिक दिव्यांग लाभार्थ्याला १ लाख रुपये तसेच सामुहिक बचत गटांना स्वयं रोजगाराकरिता रुपये ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येते असून, योजनेचा अधिकाधिक संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com