नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. ४१. विजय नगर, कळमना, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी लत्ता लिलाधरराव ठोसर, वय ६० वर्षे, हया त्यांने आपले घरी घराला दरवाजा लोदुन झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे उघड्या दारातुन प्रवेश करून, लोखंडी आलमारीतील रोख ३५,०००/- रु. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,३५,७००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे सपोनि. गव्हाने यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.