संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गावरून धावनाऱ्या अहमदाबाद हावडा एक्सप्रेस वर अज्ञात उपद्रवीकडून दगडफेक केल्याची घटना उंटखाना जवळ गतरात्री घडली असता रेल्वेगाडीतील प्रवासीत एकच खळबळ माजली.
दरम्यान रेल्वे गाडीतील नेमून असलेले रेल्वे सुरक्षा दल च्या पथकाने रेल्वे गाडी थांबवून तपासणी केली असता रेल्वे गाडीचे कोचचे खिडक्याचे काचे फुटलेले दिसले यावर पोलिसांनी तपासणी केली असता घटनास्थळी उपद्रवी दिसून आले नाही.हे इथं विशेष!तर रेल्वे पोलिसांनी या बातमीला दुजोरा देत रेल्वे रुळावरील दगड कोच च्या काचेला लागल्याने काचे फुटले असावे असा अंदाज व्यक्त केला नाही तसेच उपद्रवी कडून दगडफेक केली नाही असा ही विश्वास व्यक्त केला.