संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे मार्गावरील रेल्वे किमी क्र 1115/11 वर नागपूर कडे जात असलेल्या पुरी एक्सप्रेस च्या धडकेने एका विवाहित तरुणाचा रेल्वे अपघाती होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुरेश डायरे वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे.
.घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यसंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.