संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी १०९८ हेल्पलाईन क्रमांक 

– ‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’

नागपूर :- संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे.

बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, मतदीचे आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास त्यांना त्वरित आवश्यक मदत पुरविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ० ते १८ वर्ष वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा कार्यरत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाडक्या बाप्पाला निरोप,अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती गणपतीचे विसर्जन

Fri Sep 20 , 2024
यवतमाळ :- गेल्या दहा दिवसापासून घरगुती घरी विराजमान असलेल्या बापाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आवारणी करीत मोठ्यासह लहानग्यांनी बापाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळासह घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले अशातच यवतमाळ शहरात अनेक नागरिकांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली दररोज वेगवेगळे कार्यक्रमाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com