नेत्रदान पंधरवडा निमित्त नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया

यवतमाळ :- राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. पंधरवडा निमित्त जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमानिमित्त दि.26 नर्सिंग कॉलेज, सामान्य रुग्णालय, येथे नेत्रदान या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दि. २९ ऑगस्ट रोजी स्त्री रुग्णालय येथे नेत्रदान संकल्प राबविण्यात आला व ईच्छुकांकडून नेत्रदान संमती पत्र भरण्यात आले. दि.३० ऑगस्ट रोजी आकाशवाणी केंद्रामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालयाच्यावतीने नेत्रदान या विषयावर जनजागृतीपर माहिती देण्यात आली.

दि.२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधी मध्ये जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नेत्र चिकित्सा अधिकारी यांच्या मार्फत एकुण ३२ नेत्र तपासणी शिबिरे व जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पंधरवडा दरम्यान एकुण २ हजार ७७२ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली तर १८८ रुग्णांवर यशस्वीपणे मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

नेत्रदान पंधरवडयाचे औचित्य साधुन समुपदेशन दरम्यान एकुण ३६७ व्यक्तींनी नेत्रदानासाठी संमती देवून नेत्रदान संमतीपत्र भरण्यात आले. विशेष म्हणजे या पंधरवडया दरम्यान २ नेत्र बुब्बुळ संकलन करण्यात आले व या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी प्रदान करण्यात आली, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यातील 30 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन

Wed Sep 18 , 2024
यवतमाळ :- युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्यादृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातीन 30 महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि.20 सप्टेंबरला वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमध्ये स्व.रामभाऊ कोसलगे उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरी ता. महागाव, ईश्वर देशमुख इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी दिग्रस, अमोलकचंद महाविद्यालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com