नागपूर :- मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर ६ येथे एक वृध्द बेशुध्दावस्थेत आढळला. रेल्वे डॉक्टर राजेश ढगे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
यासंदर्भात उपस्टेशन व्यवस्थापकाकडून लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. एएसआय रवींद्र फुसाटे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतकाचे वय अंदाजे ६० वर्ष आहे. अंगावर कपडे नाहीत. त्याला एक हात आणि एक पाय नाही. त्याची ओळखही पटली नाही. शवविच्छेदनासाठी मेयो रूग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास एएसआय रवींद्र फुसाटे करीत आहेत.