जिल्ह्यात नेमणार 1 हजार 444 मुख्यमंत्री योजनादूत

Ø योजनादूतास मासिक 10 हजार मानधन

Ø 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित

Ø दूत नागरिकांना देईल योजनेची माहिती

 यवतमाळ :- सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात 1 हजार 444 योजना दूत नेमण्यात येत असून त्यासाठी दि.13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. हे योजना दूत घरोघरी जावून नागरिकांना शासनाच्या योजना सांगणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला. उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. योजनादूत म्हणून काम करण्यास इच्छूक उमेदवारास दि.13 सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात 1 हजार 205 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांमध्ये प्रती 5 हजार लोकसंख्येमागे 1 या प्रमाणे एकून 1 हजार 444 योजनादूतांची नेमणूक केली जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रज्ञा शिल बौद्ध विहार खसाळा येथील बौद्ध धम्म संस्कार शिबिराला प्रा जोगेंद्र कवाडे यांची भेट

Sun Sep 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- प्रज्ञा शिल बौद्ध विहार खसाळा ता. कामठी जि. नागपूर द्वारा आयोजित बौद्ध धम्म संस्कार शिबिर शनिवार दि. ०७.०९.२०२४ रोजी संपन्न झाले त्या शिबिराला पिरिपा चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे सांगितले की बौद्ध विहार हे धम्म संस्काराचे केन्द्र आहे. ज्या प्रमाणे आपले प्रथम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com