कृषि अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांकडून कृषि विज्ञान केंद्रास भेट व आढावा

यवतमाळ :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्रवनन एम. आणि शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी कृषी विज्ञान केंद्रास प्रक्षेत्र भेट देवून आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण, निलेश टाके, साधना सारड, कृष्णा ठाकरे, प्रदीप गुल्हाने, आशिष गायकी, कुणाल पटले, विकास गर्जे व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुरेश नेमाडे उपस्थित होते.

या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे मॉडेल व्हिलेज महमदपूर येथील आदिवासी शेतकऱ्यांना वन्यप्राणी प्रतिबंध यंत्राचे वाटप करण्यात आले. शास्त्रज्ञांनी मातीपरीक्षण प्रयोगशाळा, मृदा, ट्रायकोग्रामा मित्र कीटक निर्मिती, गांडूळखत, दशपर्णी अर्क युनिट, किटकशाखा, अझोला, शेळीपालन युनिट, पशुसंवर्धन, ड्रोन आणि कृषि औजार संग्रालय, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, पोषण बागला भेट दिली. यावेळी संबंधित तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ विशाल राठोड, डॉ.प्रमोद मगर, डॉ.गणेश काळूसे, शास्त्रज्ञ स्नेहलता, भागवत, चव्हाण यांनी माहिती दिली.

प्रक्षेत्र भेटीदरम्यान बिजोत्पादन पिक, सोयाबीन व कमी अंतर लागवड, अति घन लागवड व दादा लाड लागवड पद्धत कापूस पिकाची पाहणी केली. बैठकीच्या सुरूवातीस कापूस पिकातील प्रमुख किडीचे व्यवस्थापन पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये विविध संलग्न विभागासोबत करीत असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषि विषयक धोरण व कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कातून उत्पादनामध्ये झालेली वाढ याविषयी चर्चा करण्यात आली.

शेवटी प्रगतशील शेतकरी निलेश टाके यांच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पास भेट देवून चर्चा केली व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये कापूस पिकाचे कमी अंतर लागवड, अति घन लागवड व दादा लाड लागवड पद्धत प्रकल्प राबविण्यात असलेल्या कळंब तालुक्यातील वसंतराव इंगोले, मंदाबाई नाटक आणि राजू राऊत यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली.

कार्यक्रमाचे संचालन शास्त्रज्ञ मयूर डोले यांनी केले तर आभार राधेश्याम देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील प्रतिक रामटेके, किशोर शिरसाट, लखन गायकवाड, अमोल कडू, अश्विनी माहुरकर, भरतसिंग सुलाने तसेच शिवानी बावनकर, नयन ठाकरे, रवी राठोड, प्राची नागोसे, गौरव येलकर, अमोल वाळले, शिवम मते यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाल पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

Sun Sep 8 , 2024
यवतमाळ :- केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ५ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्याकरिता देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन अर्ज AWARDS.GOV.IN या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची दि. 15 सप्टेंबर आहे. पात्रता व अटी AWARDS.GOV.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्राप्त अर्जांच्या आधारे केंद्रीय महिला व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com