विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त कार्यक्रमासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विधानभवन येथे आज घेतली.

कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था, विधान भवन परिसरातील स्वच्छता, निवास, स्वागत, वैद्यकीय पथक, सुरक्षा पासेस, वाहन पार्किंग, प्रसिद्धी व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. विधान भवन परिसरात सर्व आरोग्य सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेट्स ची व्यवस्था करण्यात यावी, तसेच प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडण्याच्या सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या. पाऊस आणि ऊन यांच्या बचावासाठी विधान भवन प्रवेशद्वारा जवळ उपाययोजना करण्यात यावी. कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख,पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे, उपसचिव हेमंत डांगे, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सरिता हजारे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, हवामान शास्त्र, पोलीस, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र शासनाचे 11 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Fri Aug 30 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com