कामठीत मोहम्मद रफींच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील एमटीडीसी सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोहम्मद रफी यांची कन्या यास्मिन व जावई परवेज रफी यांची उपस्थिती मुख्य आकर्षण ठरले.

प्रारंभी मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक एमए कादर, गुलाम अली शेख, सुनील वाघमारे, सईद आसिफ, मो. गुलाफ, अनिल पिल्ले, रूविला जावेद, नंदीश्री कुमार, श्याम लितारे, सोहेल जान आदी कलाकारांनी मोहम्मद रफी यांच्या बहारदार गीतांचे सादरीकरण करून वातावरण संगीतमय केले. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते मोहम्मद रफी यांची कन्या यास्मिन यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन शफीक अन्सारी यांनी केले. अलीम शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रफींच्या चाहत्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील - मंत्री अतुल सावे

Fri Aug 30 , 2024
मुंबई :- नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहनही मंत्री सावे यांनी केले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com