दोन बहिणींनी केली महिला टीसीला मारहाण

– तिकीट तपासणीस कर्मचारी महिलेचा आरोप

– नखाने ओरबडले, मुरगाळला

– लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर :- आईला सोडून घरी परत जाणार्‍या दोन बहिणींनी तिकीट तपासणीस महिलेला मारहाण केली. एकीने हात पकडून ठेवले तर दुसरीने मारहाण केली. या झटापटीत कानातिल दागिने गहाळ झाले, असा आरोप महिला टीसीने केला आहे. हा खळबळ जनक प्रकार मंगळवार २७ ऑगस्ट रोजी सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. या प्रकरणी फिर्यादी टीसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार खुशबू (२३) आणि पल्लवी (३०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. खुशबू नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिची बहिण पल्लवी विवाहित असून ती नागपुरात राहाते. त्यांची आई मुलीच्या भेटीसाठी आली होती. मंगळवारी जीटी एक्सप्रेसने ती जाणार असल्याने दोन्ही मुली आईला सोडायला स्टेशनवर गेल्या. गाडी सुटल्यानंतर दोघ्याही फलाट क्रमांक आठच्या एफओबीने घरी जाण्यासाठी निघाल्या.

शिफाली कंगाले (३२) असे फिर्यादी टीसीचे नाव आहे. त्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्या नागपूर रेल्वे फलाट क्रमांक ८ च्या एफओबीवर कर्तव्यावर होत्या. खुशबू आणि पल्लवी यांना फिर्यादीने तिकीट विचारले. त्यांनी तिकीट दाखविण्यास असमर्थता दर्शविली. आईजवळच तिकीट राहीली, असे त्यांनी सांगितले. फिर्यादीने त्यांना नियमानुसार दंड भरण्यास सांगितला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच त्यांच्यात हाणामारी झाली. त्यांनी नखाने ओरबडले, हातावर मुरगाळल्याने हातावर सूज आली, तक्रारीत म्हटले आहे.

कर्तव्यावर असलेल्या इतर टीसीनी मध्यस्थी करून वाद सोडविला. यावेळी त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिन्दू जनजागृति समिति' द्वारा रक्षाबंधन हर्षोल्लास से संपन्न!

Thu Aug 29 , 2024
– सामूहिक संकल्पशक्ती वृद्धिंगत करनेवाला रक्षाबंधन! नागपुर :- हिंदू जनजागृति समिति द्वारा रक्षाबंधन के उपलक्ष पर नागपुर शहर के समाचार पात्रिकाओंके संपादक, पत्रकार, हिंदुत्वनिष्ठ, मंदिरों के न्यासी, विभिन्न हिंदू संगठनों के पदाधिकारि जैसे कई गणमान्य लोगों को रक्षा सूत्र बांधा गया। सिद्धारूढ़ स्वामी, श्री सिद्धारूढ़ शिव मंदिर; श्री सिद्धारूढ़ शिव मंदिर के ट्रस्टी प्रकाश तपस्वी, श्रीगुरू बृहस्पति मंदिरके ट्रस्टी श्रीरामनारायण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com