चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित

– राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान

– राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे

 – राज्य मराठी चित्रपट पुरस्कार अनमोल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

– ५८ व ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा

मुंबई :- मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना , प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ शिवाजी साटम, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.

तसेच यावेळी पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

58 वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),

पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ),

उत्कृष्ट संवाद :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत: – राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- विजय गवंडे ( बापल्योक ),

उत्कृष्ट पार्श्वगायक:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वगायिका:- प्राची रेगे ( गोदाकाठ )

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- सुजितकुमार (चोरीचा मामला )

उत्कृष्ट अभिनेता:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट अभिनेत्री :- मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )

सहाय्यक अभिनेता :- विठ्ठल काळे ( बापल्योक ),

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल),

प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पल्लवी पालकर ( फास )

५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),

उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट संवाद :- नितीन नंदन ( बाल भारती )

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )

उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )

सहाय्यक अभिनेता :- अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा )

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील पहिल्या राज्यगीत शिल्पाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण

Fri Aug 23 , 2024
मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यगीत शिल्पाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यगीत या शिल्पावर कोरले असून, महाराष्ट्रात असे शिल्प प्रथमच उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे शिल्प स्थापित करण्यात आले आहे. आपल्या राज्यगीताला एक सुवर्ण इतिहास आहे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com