राज्याच्या राजकारणातले लेटेस्ट गॉसिप्स : भाग 3

2010 नंतर विशेषतः देशात आणि राज्यात एकाकी असंख्य पी आर कंपन्यांचे पीक आले, राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे विविध जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून महत्व वाढवून अमुक एखाद्या नेत्याला किंवा तमुक एखाद्या पक्षाला सत्तेत आणणे हि जबाबदारी प्रामुख्याने या पी आर कंपन्या सांभाळतात, विशेषतः राजकीय पी आर कंपनीकडून मोदी आणि भाजपाची वाढलेली लोकप्रियता त्यातून त्यांना मिळालेली सत्ता तेव्हापासून तर या पद्धतीच्या कंपन्यांचे फार मोठ्या प्रमाणावर फॅड आले अगदी अलीकडे या पद्धतीच्या पी आर कंपनीला कंजूष अजित पवारांनी देखील जवळपास काही कोटी रुपये मोजले त्यानंतर ज्या पद्धतीने अजित पवारांचे आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे राजकीय वलय महत्व आणि लोकप्रियता वाढविण्याचे जे केविलवाणे प्रयत्न सुरु आहेत अनेकांचे त्यात मनोरंजन होते आहे आणि त्यांच्या मुलाखतीतून तर कंजूष आणि भ्रष्ट अजितदादांचे नेतृत्वाची लोकप्रियता वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे अखेरची घरघर लागलेल्या रोग्याला ऑक्सिजन चढवून एखाद्या लालची डॉक्टरने जसे पैसे उकळवावेत त्यापद्धतीने अजित पवारांनी कधी नव्हे ते वाया घालविलेल्या कोटी रुपयांची एखादी तल्लख पी आर कंपनी कशी नेत्यांना आणि राजकीय पक्षांना लुटते लुबाडते त्यावर हे नेमके उत्कृष्ट उदाहरण आणि पुरावा. अजितदादांनी हे पैसे गोरगरीब गरजू मतदारांवर खर्च केले असते तर त्यातून त्यांना कायमस्वरूपी मोठा फायदा नक्कीच झाला असता. अजित पवारांचा पाय या पद्धतीच्या उथळ आणि चुकीच्या प्रसिद्धीमुळे तो अधिकच खोलात गेला असे येथे मला नेमके नमूद करायचे आहे…

अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा असा कि 2014 ते 2024 या दहा वर्षात थेट देवेंद्र फडणवीस यांनी जो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विविध लोकोपयोगी कामातून ज्या वेगाने राज्याचा चौफेर विकास साधला त्यावर अलीकडे मुख्यमंत्री या नात्याने कामसू एकनाथ शिंदे यांनी जो मोठा हातभार महायुतीला लावला, वेगाने विकास कामे उरकलीत अर्थात अलीकडे त्यांना नक्कीच अजित पवारांची देखील बरी साथ मिळाली, महायुतीच्या तमाम नेत्यांना का म्हणून हे समजत नाही कि त्यांनी महाआघाडीवर अजिबात टीका न करता किंवा त्यांच्या टीकेला कुठलेही उत्तर न देता फक्त आणि फक्त केलेल्या विकास कामांची नेमकी आणि तंतोतंत माहिती जरी सोप्या भाषेतून सर्वसामान्यांसमोर मांडली तर हेच मतदार त्यांना विधान सभा निवडणुकीआधी नक्कीच डोक्यावर घेऊन थुई थुई नाचतील.

मीडियाच्या बाबतीत बोलायचे सांगायचे झाल्यास या दिवसात धंदेवाईक आणि लिखाणात किंवा बोलण्यात कोणताही अभ्यास नसतांना दलाल मीडियाचे जे अमाप पीक केवळ पैसे मिळविण्याच्या लफंग्या हेतूतून उदंड आले आहे या पद्धतीच्या मीडियावर वचक आणणे कमालीचे आवश्यक आहे. मीडियात एकेकाळी नाव कमावलेले गणेश कनाटे परीक्षित जोशी मकरंद गाडगीळ पद्धतीचे काही नामवंत पत्रकार आपला हा मार्ग सोडून थेट मोठ्या कंपनीज मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले किंवा अनेकांनी पत्रकारिता सोडून आपल्या पी आर कंपनीज काढल्या, मला वाटते यापद्धतीने अधिक पैसे मिळविण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल केव्हाही कौतुकास्पद आणि धाडसाचे पण एकीकडे पत्रकारिता करायची मीडियात नोकरी करायची आणि त्यातून होणाऱ्या ओळखीचा आणि दबाव तंत्राचा गैरफायदा व्यक्तिगत श्रीमंती वाढविण्यासाठी किंवा जेथे नोकरी करतात त्या मालकांची दलाली संभाळण्यासाठी करवून घ्यायचा हे जे काय वेश्यागत धंदे यादिवसात विविध प्रकारच्या मीडियात सऱ्हास सुरु आहेत त्याची मनापासून घृणा करावीशी वाटते. लोकमत सारख्या दैनिकात तर मंत्रालय महापालिका पोलीस इत्यादी महत्वाचे बिट्स संभाळणारे जेवढे दलाली करण्यात अधिक आघाडीवर त्यांना तेथे मोठे व महत्वाचे स्थान देण्यात येते. कदाचित दलाली करता आली नाही किंवा केली नाही म्हणून राही भिडे सारख्या उत्तम पत्रकार असणाऱ्या या मेहनती महिलेला लोकमत ने नोकरीच्या अखेरिसपर्यंत कधीही संपादक म्हणून नेमले नाही, जो अधिक बदमाश बेरकी आणि भ्रष्ट त्यांना मीडियात प्रचंड मागणी आहे असते….

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मॉरिशस आणि एनसीआय-नागपूर यांच्यात सामंजस्य करार!

Wed Aug 21 , 2024
– मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार नागपूर :- नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, मॉरिशसमधील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com