कुपोषणमुक्तीसाठी तीन तालुक्यात बाल उपचार केन्द्र कार्यान्वित

गडचिरोली :- जिल्हयात 12 तालुक्यापैकी कोरची, देसाईगंज व मुलचेरा हया तीन तालुक्यात बाल उपचार केन्द्र (CTC) नव्हते. त्यामुळे सदर तालुक्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांना उपचाराकरिता दवाखान्यात भरती करणे शक्य होत नव्हते. सदर बाब विचारात घेता गडचिरोली जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतुन अंगणवाडीतील तीव्र कुपोषण बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्याकरिता जिल्हा परिषदेच्या “जिल्हा निधीतून ” कोरची, देसाईगंज व मुलचेरा हया तीन तालुक्यात नवीन बाल उपचार केन्द्र सुरु करण्याचे आरोग्य व महिल बाल कल्याण विभागाचे समन्वयातून नियोजन करण्यात आले व त्यासाठी रुपये 20 लक्ष निधी मंजूर करण्यात आला.15 ऑगस्ट, 2024 रोजी देसाईगंज तालुक्यातील बाल उपचार केन्द्राचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कोरची व मुलचेरा या तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले बाल उपचार केन्द्राचे उद्घाटन करण्यात आले. या केन्द्रामध्ये त्या-त्या तालुक्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांना उपचाराकरिता भरती करणे सुलभ होईल. सदर दिवशी देसाईगंज-3, मुलचेरा-5 व कोरची-1 याप्रमाणे तीव्रकुपोषण बालकांना बाल उपचार केन्द्रात भरती करण्यात आले. सदर केन्द्र ग्रामीण रुग्णालय येथे सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात मध्ये 10 बालके भरती करण्याची सुविधा आहे.सदर उद्घाटन प्रसंगी आमदार कृष्णा गजबे, बाल उपचार केन्द्रामध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषण बालकांना भरती करुन त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यात यावे. याबाबत पालकांनी जागृत व्हावे, असे आवाहन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हीएमडीडीपीच्या दुसऱ्या टप्प्यामुळे दुग्धव्यवसायाला अधिक गती मिळणार - नितीन गडकरी

Mon Aug 19 , 2024
– केंद्रीय मंत्र्यांनी मानले शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि विखे पाटलांचे आभार  नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने 2016 मध्ये सुरू झालेल्या विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाला (व्हीएमडीडीपी) मिळालेले यश लक्षात घेता, या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या सहकार्याबद्दल गडकरी यांनी हा निधी मंजूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com