समाजमाध्यमांवर आपल्या प्रोफाईल छायाचित्राच्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली :- नागरिकांनी समाज माध्यम मंचावर आपल्या प्रोफाईल छायाचित्रामध्ये बदल करून त्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोदी यांनी त्यांचे प्रोफाईल छायाचित्र बदलून त्या जागी तिरंगा असलेले प्रोफाईल छायाचित्र ठेवले आहे. त्यांनी सर्वांनाच असे करून हर घर तिरंगा चळवळ एक संस्मरणीय लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी प्रत्येकाला harghartiranga.com वर तिरंगा ध्वजासोबतचे सेल्फी छायाचित्र सामाईक करण्याचे देखील आवाहन केले आहे.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“ या वर्षाचा स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना, चला आपण सर्वांनीच पुन्हा एकदा #HarGharTiranga एक संस्मरणीय लोकचळवळ बनवूया. माझे प्रोफाईल छायाचित्र मी बदलत आहे आणि तुम्ही देखील असेच करून आपला तिरंगा साजरा करण्यामध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा असे आवाहन मी तुम्हा सर्वांना करत आहे. आणि हो, तुमची सेल्फी छायाचित्रे harghartiranga.com वर सामाईक करा.”

As this year’s Independence Day approaches, let’s again make #HarGharTiranga a memorable mass movement. I am changing my profile picture and I urge you all to join me in celebrating our Tricolour by doing the same. And yes, do share your selfies on https://t.co/0CtV8SCePz

— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय रेल्वेच्या आठ (8) नवीन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी: यामध्ये महाराष्ट्रातील जालना-जळगाव- 174किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश

Sat Aug 10 , 2024
– प्रस्तावित प्रकल्प देशाच्या दुर्गम भागाला जोडून आणि वाहतूक नेटवर्क वाढवून लॉजिस्टिक कार्यक्षमतेत सुधारणा करणार, परिणामी पुरवठा साखळी सुव्यवस्थित होऊन आर्थिक विकासाला चालना मिळणार  – अंदाजे रु. 24,657 कोटी खर्चाचे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण होणार – प्रकल्पांच्या उभारणी दरम्यान सुमारे तीन कोटी मनुष्य दिवस थेट रोजगार उपलब्ध होणार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com