बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता 30 कोटी रुपये वितरित

मुंबई :-  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांना प्रकल्पात सन 2024 -25 करिता विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता बाह्य हिश्श्याचा 21 कोटी रुपये व राज्य हिश्श्याचा 9 कोटी रुपये असे एकूण 30 कोटी रुपये वितरित करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सन 2019-20 ते 2026-27 या सात वर्षांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्यात येत आहे.या प्रकल्पासाठी सन 2024 -25 या वर्षात 160 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प संचालकांच्या विनंती नुसार प्रकल्पाकरिता सन 2024 -25 मध्ये जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या दुसऱ्या तिमाहीसाठी विविध बाबींच्या अंमलबजावणीसाठी बाह्य हिश्श्याचा 21 कोटी रुपये व राज्य हिश्श्याचा 9 कोटी रुपये असे एकूण 30 कोटी रुपये वितरित करण्यात आला असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवकांना रोजगार संधीदेणारी - 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'

Fri Aug 9 , 2024
भविष्यातील आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही राज्य शासनाने सुरू केली आहे.या योजनेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी तसेच योजनेचे निकष आणि पात्रता यासंदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’व ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com