मौदा :- पोस्टे मौदा येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलीग करीत असता मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार मौजा माधनी शिवारातील रंगला पंजाब धावा येथे आरोपी नामे जागीरसिंग चन्ननसिंग संधू वय ७२ वर्ष रा. सुशिला सोसायटी, वित्तुबाबा नगर, प्लॉट नं ८१ गुरूद्वारा जवळ उपलवाडी नागपूर हल्ली मु. रंगला पंजाब ढाबा माथनी हा अवैधरीत्या विनापरवाना आपले ताब्यात देशी दारूने भरलेली १८० मिली च्या एकुण ४५ निपा किंमती ३१५०/-रू. मुद्देमाल बाळगताना मिळुन आल्याने जप्त करून आरोपीविरूद्ध पोस्टे मौदा येथे कलम ६५ (ई) मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोनि सतिशसिंग राजपूत, पोउपनि महेश बोथले व इतर स्टाफ यांनी केली.