– मनपाच्या लोक दरबार कार्यक्रमात गोंधळ !
नागपूर :- रविवारी ४ ऑगष्ट रोजी नितीन गडकरी यांच्या तर्फे नागपूर महानगरपालिका मनपा आयुक्त कार्यालयात लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारामध्ये नागपूर व नागपूरातील बाहेरची जनता मोठ्या प्रमाणात आल्यामुळे स्थानिक प्रशासनाने कुठलेही व्यवस्था समस्याग्रस्त नागरिकांसाठी केली नव्हती. २० जुलैला नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करिता नागरिक मोठ्या संख्येने मनपा प्रशासकीय कार्यालयात उपस्थित झाले होते. या लोक दरबारात समस्याग्रस्त नागरिकांचे निवेदन देण्याकरिता टोकन ची व्यवस्था असताना सुद्धा गडकरी साहेबांना निवेदन देण्याकरिता अत्यंत गोंधळ झाल्यामुळे गडकरींनी डायरेक्ट जनतेमध्ये उतरून प्रत्येकाचे निवेदन हातात घेतले. परंतु ही पद्धत योग्य नसून समस्याग्रस्त नागरिकांना स्वतःची व्यथा मांडता आली नाही किंवा त्यांची बाजू त्यांना मांडता आली व त्यांना आपली समस्या सांगता आली नाही. अशाच वेळी आक्रमण युवक संघटने च्यावतीने सुद्धा दोनशे च्यावर नागरिकां सोबत दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ईमामवाडा रामबाग इंदिरानगर जाटतरोडी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले होते त्या रास्त मागणी करिता निवेदन देत असताना गडकरी यांनी फक्त निवेदन हातात घेतले आणि हजारोच्या संख्येने लोकांचे निवेदन हातात घेऊन त्यांनी आपल्या घरचा रस्ता गाठला या अशा कार्यक्रमाची पूर्वतयारी व्यवस्थित न झाल्यामुळे लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि नितीन गडकरी कार्यक्रमातून निघून गेले, लोकांची संख्या चार हजाराच्या वर होती. त्यामुळे हा लोक दरबार केवळ जनतेला दिशाभूल करणारा व केवळ आश्वासन देणारा लोकदरबार होता आणि म्हणूनच आक्रमण युवक संघटनेने थेट लोक दरबारातच, नितीन गडकरी यांच्या विरोधात नारे निदर्शने लावून जाहीर त्यांचा निषेध करतांना या कार्यक्रमाची दुरा व्यवस्था करिता स्थानिक मनपा आयुक्त जिल्हा कलेक्टर प्रशासकीय विभाग दोषी असून यांची समीक्षा घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आक्रमण युवक संघटनेने लोक दरबारात केली. आक्रमण संघटने च्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही निषेध करण्यात आला. या जाहीर निषेध मध्ये आक्रमण युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे, जिल्हा संघटक प्रमुख, विशाल बनसोड जिल्हा सचिव सुरज पुराणिक, नागेंद्र पाटील, शहर सचिव अश्विन पाटील, जिला संगठन दीक्षा चौरे, रामू चाचेरे, दीपक पाटील, दिलीप दिलीप बांसोड़,समस्याग्रस्त नागरिकांमध्ये, टीना शेंडे, रत्ना बागडे गुंजन पाटील, सुरेखा भगत, सिला फुलमाळी, निर्मला बहादुरे, कुसुम पाटील, शोभा गजभिये, शिला नारांजे, कविता वासनिक , नीलू तोले प्रिया अंबागड़े, लक्ष्मी चौहान तारा महेशकर, प्रतीक्षा रामटेक, देविका बाई मुनेश्वर, आशा महेशकर, उषा रंगारी गिरीजा कांबळे, इत्यादी मोठ्या संख्येने महिला ग्रस्त या लोक दरबारात सहभागी होत्या.