-‘पीरिपा’तर्फे नामांतर शहिदांना मानवंदना
नागपूर :- संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाल्यानंतर मराठवाड्यात दलितांवर हिंसाचार घटना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. या जातीय हिंसाचाराच्या विरोधात पहिली प्रतिक्रिया नागपुरात ४ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चाच्या रुपाने उमटली, यात नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. नागपुरातील पाच शहिदांच्या बलिदानानेच नामांतर आंदोलनाला उभारणी मिळाल्याचे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रविवारी इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकावर आहुती देणाऱ्या भीम सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे बोलत होते. अभिवादन सभेला कवि ई. मो.नारनवरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रतिमा जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, जेष्ठ नेते अजय चव्हाण, युवक शहर अध्यक्ष सोहेल खान, सुनिल कांबळे, दक्षिण पश्चिम नागपुर अध्यक्ष स्वप्निल महल्ले, दिलीप पाटील, बाळू मामा कोसमकर, प्रकाश मेश्राम, बाबा बोरकर, बाळू भंडारे आदिंच्या प्रमुख उपस्थिती शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
चिकनगुनीया या आजारामुळे रुग्णालयात भरती असलेले जयदीप कवाडे यांनी डॉक्टरांकडून विशेष विनंती वर एक तास अभिवादन सभेला हजेरी लावली. पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, इतिहासाचा साक्षीदार व आंदोलनाचा धगधगती आग म्हणजेच नामांतराचा लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. मराठवाड्यातील अत्याचाराविरोधात पहिले आंदोलन इंदोऱ्यात ४६ वर्षापूर्वी ४ ऑगस्ट १९७८ रोजी झाले. यात मोर्चातून परतणाऱ्या भीम सैनिकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण माकले, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन, अविनाश अर्जुन डोंगरे हे शहीद झाले होते. तो दिवस म्हणजे ४ आगस्ट हा शहीद दिवस पाळला जातो. या बलिदानानंतर नामांतर आंदोलनाला वेगेळे स्वरूप आल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
अभूतपूर्व लढ्याचा साक्षीदार इंदोरा
विधिमंडळाने संमत केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी लॉंगमार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दीक्षाभूमी ते औरंगाबाद असा ऐतिहासिक लाँग मार्च काढण्यात आला होता. ११ नोव्हेंबर १९७९ रोजी निघालेल्या या लाँग मार्चची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’मध्ये घेण्यात आली. नामांतरासाठी झालेला अभूतपूर्व लढा व त्यात प्राणाची बाजी लावून लढलेले भीमसैनिक यांच्या त्यागामुळेच नामांतर झाले आहे. या लढ्यात नागपुरातील इंदोरा येथील गोळीबारात सर्वस्वाचे बलिदान ज्यांनी केले त्या शहिदांना मानाचा मुजरा, असेही कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. यावेळी करण बागडे, विक्की बनकर, अमित यादव, सुमित डोंगरे, हिमांशू मेंढे, आयुष दहिवले, महावीर पाल, कुशिनारा सोमकुवर, महेंद्र नागदिवे, भिमराव कलमकर, अजय चव्हाण, शैलेन्द्र भोंगाडे, प्रज्योत कांबळे, कु. अस्मिता जयदीप कवाडे, महिंद्र पावडे, डेनी सोमकुंवर, कुणाल मेश्राम, रोशन तेलतूमड़े, दिनेश मोटघरे, विजय अंडस्कर, योगेंद्र कन्हैरे, राहुल मेश्राम, कौस्तुभ चौधरी, विजय बवाने, अजय ब्राम्हणे आदि पीरिपाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.