महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जुलै महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात. जुलै-२०२४ मध्ये दि. ०९/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. २०/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी, आषाढी विशेष, दि. १७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी आणि दि. २७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक(वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2407-D/27223 या किशोर लॉटरी सेंटर, सांगली यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. ११ लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.महाराष्ट्र गणेशलक्ष्मी आषाढी विशेष तिकीट क्रमांक GS-02/7353 या सिराज एन्टरप्रायझेस, नागपूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.

याशिवाय जुलै- २०२४ मध्ये मासिक सोडतीतून १२९७५ तिकिटांना रू. ३१,४१,०५०/- व साप्ताहिक सोडतीतून ३५७०८ तिकिटांना रू. १,०८,४६,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्ष‍िस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक(वित्त व लेखा),महाराष्ट्र राज्य लॉटरी,वाशी यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जरांगे जरा जपून मनोजकुमार होईल  

Sat Aug 3 , 2024
जरांगे तुमचे सामाजिक महत्व राजकीय अस्तित्व आणखी किती दिवस टिकवून ठेवायचे किंवा क्षणार्धात केव्हा संपवायचे हे होणाऱ्या विधान सभा निवडणूक निकालांवर ठरेल… म्हणजे शरद पवारांची महाआघाडी निवडून आली सत्तेत आली कि शपथविधी उरकताच जत्रा आटोपल्यासारखे त्यानंतर पुढल्या काही दिवसात आरक्षणाची मागणी बासनात बांधल्या जाईल आणि यादिवसात तुम्हाला तुमच्या सभोवताली जी कार्यकर्त्यांची नेत्यांची टग्यांची,आंदोलनकर्त्यांची सूज आलेली आहे ती लगेच उतरेल ओसरेल…त्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com